Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथे अज्ञाताकडून पपईच्या वृक्षांची नासधुस

team by team
August 29, 2022
in क्राईम
0
बोरद येथे अज्ञाताकडून पपईच्या वृक्षांची नासधुस
बोरद  l प्रतिनिधी
येथे एका शेतकऱ्याच्या शेतात सुमारे ३५ पपईच्या वृक्षांची अज्ञात माथे फिरुने कत्तल केली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी बोरद येथील शेतकरी गणेश पुना पाटील हे आपल्या सर्व्हे नंबर १५७/१ या शेतात नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता गेले असता  आपल्या नित्य सवयी प्रमाणे शेतात लागवड केलेल्या पपईच्या बागाची पाहणी करत होते.
 त्यावेळी पाहणीसाठी गेले असता त्यांच्या असे निदर्शनास आले की, शेतामधील मागच्या बाजूला असलेल्या बागेतील  साधारणतः ३० ते ३५ पपईच्या झाडांची थडग्यापासून अज्ञात माथे फिरूने कत्तल केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हा प्रकार त्या ठिकाणी पाहून ते हादरूनच गेले. मोठ्या कष्टाने त्यांनी पाच एकर पाच गुंठे या क्षेत्रामध्ये गेल्या मे महिन्यात पपईच्या रोपांची लागवड केलेली होती. ही रोपे पाच महिन्याची झालेली आहेत ह्या रोपांना स्वतःच्या लहान मुलाप्रमाणे आतापर्यंत जपले आहे .परंतू त्यातील काही रोपांची झालेली अवस्था पाहून शेतातच त्यांना रडू कोसळले, भरदार वृक्षांमध्ये परिवर्तित होणाऱ्या रोपांची डोळ्यादेखत झालेली कत्तल त्यांना हताश करून गेली.
      त्या अवस्थेत स्वतःला सांभाळत ते गावात आले आणि त्यांनी गावातील लोकप्रतिनिधी यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले.व लागलीच त्यांनी  मंगेश पाटील यांच्याशी भेट घेत घटनेची माहिती दिली .त्याचबरोबर शेतातील रोपांची परिस्थिती ही दाखवली यानंतर बोरद दुरक्षेत्राला घडलेल्या घटनेची माहिती दिली.  बोरद दुरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी तळोदा संपर्क साधत यासंबंधी तळोदा येथे अर्ज देण्यास सांगितले.
        गणेश पाटील यांनी तळोदा गाठत तळोदा पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेबाबत तक्रारी अर्ज दाखल केला.या अर्जाची लागलीच दखल घेत पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी बोरद दुरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना घडलेल्या घटनेची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
गेल्या २ वर्षांपूर्वी अशाच घटना शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात घडल्या आहेत .अज्ञात माथेफिरूकडून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पपईच्या झाडांची नासधूस करण्यात आली होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

आयुर्वेदिक उपचार हे लाभदायक : ना.डॉ.विजयकुमार गावित

Next Post
आयुर्वेदिक उपचार हे लाभदायक : ना.डॉ.विजयकुमार गावित

आयुर्वेदिक उपचार हे लाभदायक : ना.डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add