नंदुरबार l
येथील खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते मुकबधिर निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

नंदुरबार येथील मिराज सिनेमा हॉल कोकणी हील नंदुरबार येथे युनिटी फाऊंडेशन नंदुरबारर्फे जि.प.सदस्या (कोळदा गट) डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त जी.एन.पाटील यांच्याकडून मनुदेवी फाउंडेशन नंदुरबार संचलित मुकबधीर निवासी विद्यालय व मतिमंद मुलांची निवासी विद्यालय दुधाळे येथील मुकबधीर व मतीमंद विद्यार्थ्यांना संसदरत्न खा.डॉ.हिना विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
मनुदेवी फाउंडेशन नंदुरबारचे संस्थापक तथा भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी यांच्या हस्ते खा.डॉ.हिना गावीत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा.डॉ.गावीत यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राजेश चौधरी यांनी उत्कृष्ट कामाबद्दल कौतुक केले. यावेळी जी.एन.पाटील (खोंडामळी), खोंडामळी गटाचे जि.प.सदस्य तसेच भाजपा तालुका अध्यक्ष दिपक पाटील, पदधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.








