नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे.
दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे . गणेशोत्सव काळात गणपती मंडळांना गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप , स्टेज उभारणी करणे , गणेश मंडळाची स्थापना करणे इत्यादी विविध प्रकारच्या परवान्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी जावे लागते त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक खिडकी योजना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला होता .
गणेशोत्सव काळात गणपती मंडळांना गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप , स्टेज उभारणी करणे , गणेश मंडळाची स्थापना करणे इत्यादी विविध प्रकारच्या परवान्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी जावे लागते त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेवून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एक खिडकी योजना दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी सुरु करण्यात आली असून आज पासुनच एक खिडकी योजना कार्यान्वीत झाली आहे .
गणेशोत्सव मंडळाकडून मंडप , स्टेज किंवा गणेश मंडळ स्थापन परवानगी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क नसल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी एक खिडकी योजनेचा लाभ घेवून सर्व आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करुन घ्याव्यात असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले . ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित गणेशोत्सव मंडळ ज्याठिकाणी गणेश मंडळाची स्थापना तसेच स्टेज , मंडप किंवा इतर देखावे उभारणार आहे , त्या जागेची संबंधित पोलीस ठाण्यामार्फत पाहणी केली जाईल .
पायी ये – जा करणाऱ्या लोकांना किंवा वाहनांना त्रास होणार नाही याची खात्री केल्यानंतरच संबंधित गणेश मंडळाला परवाना दिला जाईल . जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मंडळ स्थापन करतेवेळी एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करुन परवानगी घ्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .








