अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात यात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अक्कलकुवा शिवसेनेच्या वतीने आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम झाला. तसेच तालुक्यातील कोयलीविहीर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी आमदार पाडवींसह शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके, जि.प.सदस्य शंकर पाडवी, युवासेना जिल्हाधिकारी ललित जाट,
जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नवरतन टाक, विनोद वळवी, रवी पाडवी, जिल्हा उपप्रमुख विजय ब्राम्हणे, तुकाराम वळवी, पृथ्वी पाडवी, रवींद्र चौधरी, माजी तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी उपस्थित होते. अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष परमार, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पवार, डॉ. ममता देवरे, औषधनिर्माण अधिकारी जयश्री राठोड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अतुल कल्याणी, आयसीटीसी समुपदेशक महेश कुवर,
अधिपरिचारिका तबस्सूम पठाण, वैशाली पवार, जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे वैज्ञानिक अधिकारी जयेश सोनवणे, अधिपरिचारक विकास बामने, लोटन वसावे यांनी रक्तसंकलन केले. शिबिरासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मगन वसावे, इम्रान पठाण, जगदीश चित्रकथी, जितेंद्र लोहार, कुलदीप टाक, गोलू चंदेल, दीपक मराठे, रोहित चौधरी, तुकाराम वळवी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवींद्र गुरव आदींनी विशेष सहकार्य केले.








