नंदुरबार l प्रतिनिधी
प.पू.पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे नंदनगरीत येंत असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि.29 व 30 ऑगस्ट रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
शिबीराचा शुभारंभ सकाळी 10 वाजता पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी व मान्यवरांचा उपस्थितीत होणार आहे.
गुरुजी आयुर्वेद नाशिक यांच्या वतीने मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.29 व 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत शिबीर होणार आहे. सदर शिबीर पारेश्वर मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स, संजीवनी क्लिनिकच्या प्रांगणात भव्य सभामंडपात, लक्ष्मी पावभाजी समोर हॉटेल सायनीच्या बाजूला नळवा रोड नंदुरबार येथे होणार आहे.
या शिबीरात तज्ञ डॉक्टर व महिला डॉक्टरांकडून रूग्णांची तपासणी करण्यात येईल. या शिबीरात गॅस अॅसिडीटी, कफ खोकला, जुनाट सर्दी, संधीवात, गळ्याचे विकार अस्थमा, आमवात, सायटीका, शित-पीत्त, अर्धशिशी तारुण्यपिटीका, हृदयरोग, मुळव्याध, मुतखडा, केस पिकणे, डायबिटीस, त्वचारोग रक्तदाब, पोटाचे विकार, यांची तपासणी करुन उपचार केले जाणार आहेत.
दरम्यान शिबीरासाठी पारेश्वर मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स, संजीवनी क्लिनिक हॉटेल सायनीच्या बाजूला, नळवा रोड नंदुरबार (मो.9028181915) यांच्याकडे शिबीरासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवचन व समस्यांवर समाधान
भागवत भुषण, ज्योतिषाचार्य प.पू.पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे दि.29 व 30 ऑगस्ट रोजी शिबीराला उपस्थित राहणार असून नागरीकांना त्यांची भेट घेता येईल. नागरीकांना ज्योतिष, विवाह नोकरी, व्यवसाय, समस्या या विषयावर त्यांचे मार्गदर्शन घेता येईल.
तसेच मंगळवार दि.30 ऑगस्ट 2022 रोजी शिबीर स्थळी सायंकाळी 5 वाजता प.पू.पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचे कथा प्रवचन होईल. मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार शिबीर, कथा प्रवचानाचा लाभ घेण्याचे आवाहन गुरुजी आयुर्वेद यांच्या वतीने करण्यात आले आहे.








