नंदुरबार l प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादीचे युवानेते राऊ दिलीपराव मोरे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसे नियुक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे राऊ मोरे देण्यात आले.
राऊ मोरे यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये असताना पक्षबांधणी तसेच कार्यकर्ते जोडणीसाठी मोलाची कामगिरी केली आहे. युवक वर्गात त्यांनी एक वेगळा ठसा उमटविला आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी ही नियुक्ती केली.
दरम्यान, पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विचार घराघरात पोहोचविण्यास राज्यात युवकांचे संघटन करण्यावर भर देणार असल्याचे राऊ मोरे यांनी निवडीनंतर सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष ललित बागूल उपस्थित होते. राऊ मोरे यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा तसेच सर्व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.