नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहर नाभिक समाज पंचमढी ट्रस्टतर्फे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी प्रतिमा पूजन, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवाने साजरी करण्यात आली. संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित शिबिरात 38 दात्यांनी रक्तदान करुन आदर्श निर्माण केला आहे. विविध कार्यक्रमातून संत सेना महाराज यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला.
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन नंदुरबार शहर नाभिक समाज पंचमढीच्या वतीने काल दि.23 ऑगस्ट 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या डोममध्ये कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला सत्यनारायणाची महापुजा करण्यात आली. तसेच नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन तथा उद्योगपती मनोज रघुवंशी, प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेवक किरण रघुवंशी, नगरसेवक दीपक दिघे यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक राजपूत, बाबासाहेब राजपूत, जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, हिरालाल चौधरी, नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष किशोर सोनवणे, धनराज वरसाळे, दिलीप बोरसे, नाभिक समाज पंचमढीचे अध्यक्ष नानाभाऊ शिरसाठ, सचिव सुनिल वरसाळे, दिपक शिंदे, छोटुभाऊ अहिरे, गोविंद बोरसे, गोपाल शिरसाठ, खुशाल साठे, काशिनाथ पवार, माधुरी पवार, प्रमोद महाले, राजेंद्र अहिरराव, अमोल गांगुर्डे, अनिल महाले, प्रकाश सैंदाणे, नानाभाऊ सोनवणे, पंडीत बोरसे, माजी महिला शहराध्यक्षा कुंदाबाई सोनवणे, महिला शहराध्यक्षा गायत्रीबाई सैंदाणे, विमलबाई मंडलिक आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या मृणाल प्रकाश सैंदाणे या तरुणाचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील दहावी, बारावी, पदव्युत्तर व विविध क्षेत्रात यश मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, भेटवस्तु व प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला.
यावेळी कुंदाबाई सोनवणे यांनी संत सेना महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देवुन मार्गदर्शन केले. जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमातील नेत्र तपासणी शिबिरात 10 समाजबांधवांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. रक्तदान शिबिरात समाजातील 38 तरुण-तरुणींनी रक्तदान करुन संत सेना महाराजांना अभिवादन केले.
रक्त संकलनासाठी जनकल्याण रक्तपेढीच्या डॉक्टरांसह कर्मचार्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र लुळे यांनी केले. आभार नाभिक समाज पंचमढीचे सचिव सुनिल वरसाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुरबार शहर नाभिक पंचमढी ट्रस्ट मंडळ, नंदुरबार शहर नाभिक हितवर्धक संस्था, नंदुरबार शहर नाभिक दुकानदार संघटना, नंदुरबार शहर नाभिक युवा मंच यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाजातील तरुणांनी परिश्रम घेतले