नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील माँ जी नगरात घरगुती किरकोळ कारणावरुन पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासू व दीर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील मॉँ जी नगरात राहणाऱ्या नुरजहॉ शाहरुख पठाण यांना घरगुती किरकोळ कारणावरुन पती शाहरुख रोशन पठाण, सासू जाकीया रोशन पठाण व दीर साहील पठाण यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत नुरजहॉ शाहरुख पठाण यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.किरण पावरा करीत आहेत.








