नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात साजरे झालेले रमजान ईद, शिवजयंती, विविध महापुरुषांच्या जयंती, रामनवमी, मोहरम विश्व आदिवासी गौरव दिन तसेच आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव काळात डी. जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवानास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी. जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते नंदुरबार जिल्ह्यातील 235 मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशंसापत्र देवून सत्कार करण्यात आला होता. डी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते की, नंदुरबार जिल्ह्यात सण व उत्सव साजरे करतांना डी. जे. व डॉल्बी सिस्टीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे ध्वनी प्रदुषण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होतो. तसेच डी.जे. व डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे वृद्ध इसम आजारी इसम, लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो त्यामुळे डी. जे. व डॉल्बीचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवल्यास डी. जे. व डॉल्बी धारकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे असे पोलीस दलातर्फे कळविण्यात आले होते.
दि 20 ऑगस्ट 2022 रोजी रात्र 23.30 वा. सुमारास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील टोकरतलाव या गावात लग्नामध्ये डो. जे. व डॉल्बीच्या उच्च आवाजात काही इसम आरडाओरड करुन नाचत आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तात्काळ नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना माहिती कळवून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी पथकासह टोकरतलाव गावातील डी.जे. व डॉल्बी वाजत असलेल्या ठिकाणी जावून पाहणी केली असता (GJ-05 AU-3443) या आयशर वाहनावर बँड लावलेला दिसला व लोकांना त्रास होईल अशा बँडच्या कर्कश आवाज येत होता म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार व त्यांच्या पथकाने (GJ-05 AU-3443) या आयशर, बैंड मालक व त्याचे सोबत असलेल्या इतर 4 इसमांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच (GJ-05 AU-3443) या आयशर गाडीव त्यावरील बैंड जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत (GJ-05 AU-3443) ही आयशर
गाडी प्राधिकरणाकडे पाठविली असता त्यांनी (GJ-05 AU-3443) या आयशर गाडी मालकाला 29 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
ध्वनी प्रदुषण नियम व नियंत्रण सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा कलम 15 प्रमाणे 5 वर्ष कैदेची किवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा हो शकतात. तसेच शिक्षा होवून सुध्दा असे गुन्हे केल्यास 5 हजार रुपये दंड प्रत्येक दिवसाला व शिक्षा लागल्याच्या वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 वर्षाची शिक्षा होवू शकते, त्यामुळे गणेशोत्सव का सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात करू नये, तसे आढळून आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार 02564-210100/- 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.








