नंदुरबार l
शहादा शहरातील बसस्थानक परिसरात रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघा हात लॉरीधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील बसस्थानक परिसरात राहूल मनोहर शर्मा व जावीदखान अशपाक खान बागवान या दोघांनी त्यांच्या ताब्यातील हातलॉरी रस्त्यावर लावून रहदारीस अडथळा निर्माण करतांना आढळून आले. याबाबत पोशि.अनिल पावरा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम २८३ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.








