नंदुरबार l
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली व शहादा शहरातील एका शाळेच्या कंपाऊंडमधून अशा दोन ठिकाणाहून दोन मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील सैदाणीपाडा येथील अक्षय गणेश कोकणी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.जी.जे.05 एचबी 3922) धुळे चौफुलीजवळील एका बंद दुकानाजवळून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत अक्षय कोकणी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.सामनसिंग वसावे करीत आहेत.
तर शहादा तालुक्यातील म्हसावद येथील विश्वनाथ गोरख पाटील यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.39 के) शहादा शहरातील एका शाळेच्या कंपाऊंडमधून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत विश्वनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ.संजय ठाकूर करीत आहेत.








