नंदुरबार l
शहादा शहरातील एका शाळेजवळून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील शिरुड चौफुली परिसरात राहणारी एक 14 वर्षीय मुलगी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शाळेत जाते असे सांगून गेली.
मात्र सायंकाळपर्यंत परत आली नाही. शहादा व परिसरात तिचा शोध घेतला असता आढळून आले. त्यामुळे मुलीच्या आईने शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित विक्की सुका सुळे याच्याविरोधात भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय ठाकूर करीत आहेत.








