नंदूरबार l प्रतिनिधी
75 व्या अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व जिल्हा अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा नंदुरबार,बुधाभाई पाटील” यांच्या प्रेरणेने आणि अभियानातर्फे फत्तेपूर,ता.शहादा येथे कार्यक्रम घेण्यात आला.
नेहमी आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणारे “माननीय जिल्हा उपाध्यक्ष,भाजपा किसान मोर्चा कपिल रमणलाल जायस्वाल यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम करण्यात यावेळी दुर्गम भागात असणारे विद्यार्थी,गरीबीचे परिस्थिती असताना आणि कोणते खाजगी शिकवणी नसतांना उत्कृष्ट गुणवत्ताने उत्तीर्ण झाल्यामुळे भाजपा किसान मोर्चा नंदुरबार,तर्फे प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सत्कार आणि सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रगतशील शेतकरी म्हणून भीमसिंग जामा ठाकरे यांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला. आणि त्याचबरोबर गुणवान विद्यार्थिनी म्हणून सपना चुनीलाल पाडवी रा. आमोदा,ता.शहादा हिने माध्यमिक विद्यालय आमोदा,ता.शहादा,या शाळेत दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के उतीर्ण होऊन प्रथम क्रमांक मिळवला, कुमारी आरती लक्ष्मण नाईक रा. फतेपुर हिने ८५ टक्के उतीर्ण होऊन होऊन द्वितीय क्रमांक आल्याने दोन्ही विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला.
यावेळी दिलीप चितळे (उपसरपंच), विशाल ठाकरे (सदस्य),सलमान कुरेशी (कार्यकर्ता), रहीस कुरेशी, आप्पा पवार, जितेंद्र ठाकरे ,भीमा पवार, लक्ष्मण नाईक, रोहित नाईक, किरण वळवी ,अरबाज शेख,लक्ष्मण ठाकरे,सब्बू कुरेशी,विक्रम बाम्हने,दिलीप वसावे,सुदाम पवार,नाजीर खान कुरेशी,रमेश पटेल,जयसिंग वळवी,रवींद्र वाघ,कैलास वळवी,लुकमान कुरेशी, भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.








