Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कर्णकर्कश सायलेन्सरसह जप्त नंबर प्लेट, हॉर्नवर फिरविला रोलर

team by team
August 21, 2021
in क्राईम
0
कर्णकर्कश सायलेन्सरसह जप्त नंबर प्लेट, हॉर्नवर फिरविला रोलर
नंदुरबार । प्रतिनिधी
धुळे शहर वाहतूक शाखेने कारवाई करून जप्त केलेल्या कर्णकर्णश आवाज करणार्‍या सायलेन्सरसह दादा, मामा, नावाच्या नावांच्या 32 नंबर प्लेटांवर व हॉर्नवर आज संतोषी माता चौकात रोडरोलर फिरविला. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने ही कार्यवाही करण्यात आली
 धुळे शहरातील अनेक बुलेट दुचाकी धारकांनी कंपनीने दिलेल्या सायलेन्सर ऐवजी कर्कश आवाज करणारे मॉडीफाईड सायलेन्सर बसवुन शहरात ध्वनी प्रदुषण करतात. अशा एकुण 29 बुलेट धारकांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करुन त्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर शहर वाहतुक शाखेत येथे जमा करण्यात आले होते. तसेच काही दुचाकी चालक नियमाप्रमाणे वाहनास नंबर प्लेट न लावता फॅन्सी नंबर प्लेट  (दादा,अण्णा, मामा,काका) अनाधिकृत 32 नंबर प्लेट वाहन चालकांवर कारवाई करुन त्यादेखील जमा करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे ध्वनी प्रदुषण करणारे कर्कश (म्युझिकल) हॉर्न वापरणारे 7 वाहन धारकांवर कारवाई करुन ते म्युझिकल हॉर्न ही जमा करण्यात आले आहेत. असे एकुण जप्त करण्यात आलेले 29 मॉडीफाईड सायलेन्सर, 32 फॅन्सी नंबर प्लेट, 7 म्युझिकल हॉर्नवर पोलीस अधिक्षकांच्या आदेशान्वये आज सकाळी  संतोषीमाता चौक रोड रोलर फिरवुन नाश करण्यात आले आहेत.
ही विशेष मोहिम पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक धिरज महाजन, सपोनि संगीता राऊत, उपनिरीक्षक रामदास जाधव व शहर वाहतुक शाखेचे सर्व पोलीस अंमलदार यांनी राबविली होती. दरम्यान  महिन्यात 54 लाखांचा दंड वसूल जानेवारी 2021 ते माहे जुलै 2021 अखेरपर्यंत शहर वाहतुक शाखेतर्फे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या 33 हजार 200 वाहन चालकांवर मो.व्हि.अ‍ॅक्ट प्रमाणे कारवाई करुन 54 लाख 94 हजार रोख तडजोड शुल्क वसुल करण्यात आले असुन 53 लाख 77 हजार 700 रूपये इतके तडजोड शुल्क अपडेत आहे. अपडेट तडजोड शुल्क वसुलीसाठी वाहन धारकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे देखील जे वाहन चालक मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे. तरी कोणीही मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करु नये, अन्यथा वरप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वाहतूक शाखेने दिला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पैसे देण्यास नकार दिल्याने फायटरने मारहाण, एकास अटक

Next Post

आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्वृती परीक्षेत श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत

Next Post
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्वृती परीक्षेत श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत

आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्वृती परीक्षेत श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add