नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद शाळा खाई येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लोकसहभागातून नाविण्यपूर्ण शैक्षणिक, सहशालेय उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्याचे पालक पर्यावरणप्रेमी, ग्रामस्थ शिक्षणाविषयी जागरूकता असल्याने नेहमीच अग्रेसर असतात. शाळेभोवती मोकळी जागा बघून निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेतलेले ग्राम पंचायत सदस्य संपत पाडवी यांच्या कल्पकतेने लोकवर्गणी करुन झाडांची रोपे आणून शाळेच्या परीसरात लागवड केली.
गुलाबसिंग पटले मानवी जीवनात पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे, यावर भाषण दिले त्यांनी भाषणातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरळीतपणे संपन्न झाला.उपस्थित पालकांचे मुख्याध्यापक वनसिंग पाडवी सर्वांचे अभिनंदन केले. प्रत्येकाने किमान एक मुल एक झाड लावावे अशी माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक वनसिंग पाडवी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थी आणि पालकांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. खाई शाळेच्या परिसरात शोभेची झाडे लावण्याकरिता दिलवरसिंंग वळवी पोलीस पाटील, मुकेश पाडवी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच विजय पाडवी, सायसिंग वसावे, यशवंत वसावे, रतिलाल पाडवी, मांगिलाल पाडवी, कर्मा नाईक यांचे सहकार्य लाभले.








