नंदुरबार l प्रतिनिधी
खा . डॉ . हिना विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नातून नंदुरबार लोकसभा मतदार संघातील नंदुरबार जिल्ह्यासह शिरपूर व साक्री येथे बीएसएनएलच्या १४५ मोबाईल टावर्सला मंजुरी मिळाली आहे .
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील अनेक नागरिकानी बीएसएनएलच्या नेटवर्किंग संदर्भात खा . डॉ . हिना गावित यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या .त्या तक्रारींची दाखल घेत खा.डॉ. हिना गावित यांच्या प्रयत्नातून नंदुरबार जिल्ह्यासह शिरपूर आणि साक्री तालुक्यातील गावांसाठी मोबाईल टावर मंजूर करण्यात आले आहेत . यात नंदुरबार ३ , नवापूर १८ , तळोदा ३ , अक्कलकुवा २६ , धडगाव ४३ , शिरपूर ३ , साक्री ४ ९ अशा १४५ मोबाईल टावर्सला मंजुरी मिळाली आहे . यामुळे धडगाव ,
अक्कलकुवा व तळोदा या दुर्गम भागासह शिरपूर व साक्री तालुक्यातील गावांमधील मोबाईल नेटवर्कींगची समस्या सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .