नंदुरबार-
येथील श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेषभूषा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत तसेच तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील तमाम गणेश भक्तांनी सहभाग नोंदविला.
भारत मातेच्या प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच पाळीव कबुतरांना बंधनातून स्वतंत्र करण्यात आले. यावेळी श्रीमंत बाबा गणपतीची रथावर स्थापना केली. कार्यक्रमात बालगोपालांचा मोठा सहभाग होता. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे शहीद वीरांच्या वेशभुषेत बोलगोपालांनी भाषणे देवून देशभक्तीपर गीतावर बालगोपालांनी तसेच महिलांनी नृत्य सादर केले.
बक्षिस वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे श्रीमंत बाबा गणपती मंडळाचे अध्यक्ष आशिष जळगांवकर, उपाध्यक्ष पियुष सोनार, उपाध्यक्ष हर्षल सोनार, कार्याध्यक्ष राजेश सोनार, खजिनदार स्वप्निल सोनार, सचिव राहुल सोनार, सहसचिव मयुर सोनार, सहखजिनदार ओम सोनार, सल्लागार विकास सोनार, महेश सोनार, सुशिल पंडीत, जिग्नेश सोनार, मोरेश्वर सोनार, अभिषेक सोनार, रिंकु सोनार, सदस्य प्रसाद सोनार, राम सोनार, नितीन सोनार, रितीक सोनार, शिवम सोनार, शुभम सोनार, कुणाल सोनार, जयेश सोनार, सुविध सोनार, सुयोग सोनार, गौरव सोनार, आयुष सोनार, मेहुल सोनार, सिद्धार्थ सोनार, भुषण सोनार, वैभव सोनार, रिद्धेश सोनार, सुभम सोनार समस्त सुवर्णकार समाज बांधव, परिसरातील नागरीक उपस्थित होते.