नंदुरबार-
आम आदमी शेतकरी संघटनेच्या नंदुरबार प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सावळीराम शिवाजी करीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी सावळीराम करीया यांना दिले.
नियुक्तीपत्रात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे प्रश्न जिद्दीने मार्गी लावून शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहून काम कराल. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे धोरण व सामान्य माणसांविषयी योजना आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कराल. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहल हीच अपेक्षा. प्रभारी नियुक्ती पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नेमणूक होईपर्यंत आपण नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटना व शेतकरी बांधवांचे प्रश्न हाताळावेत, अशीही अपेक्षा नियुक्तीपत्राद्वारे करण्यात आली आहे.