नंदुरबार । प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील प्रा.आ.केंद्र राकसवाडातंर्गत करजकुपा व नळवे खु येथे आझादी का अमूत महोत्सव अभियान अंतर्गत किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जाफर तडवी, बालविकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी, राकसवाडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय विंचूरकर,रोटरी क्लबचे राजेश पुजारा,निर्मल गुजराती,केंद्र प्रमुख लीलाधर देसले, मुख्याध्यापक गुलाबसिंग वळवी, रघुनाथ पाटील,अनिल ठाकरे,राहुल सोनवणे, ग्रामसेवक सी.आर. करोडीवाल उपस्थित होते. सदर कार्यक्रमात किशोरी मुलींचे हिमोग्लोबिन व सिकलसेल तपासणी करण्यात आली तसेच त्यांना पोषक आहार विषयी विविध पदार्थ बनवून स्टॉल लावून माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमात रोटरी क्लब नंदुरबार तर्फे प्रत्येक किशोरी मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले. तसेच त्यामध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम व कुपोषणाचे कारणे व कुपोषणाचे दुशपरिणाम आणि सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक अन्नघटक यासंदर्भात माहिती देण्यात आली.
आर.व्ही.खैरनार यांनीही किशोरी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरती बाविस्कर, रेखा धात्रक, सावित्री गावित, मंगेश बडक,आरोग्य सेविका अलका मराठे,आरती वळवी, सुनंदा वाघ,अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनीता सोनवणे,गायत्री वळवी,सुनीता नाईक,फुलबाई वळवी,मनीषा पाटील,आशा चौधरी, मीना पाटील,देवकण्या पाटील,योगिता पाटील, आशा कार्यकर्ती योगिता नाईक,आशा चव्हाण,रमीला नाईक,करुणा वळवी व आरोग्य सेवक हितेश सुगंधी यांनी परिश्रम घेतले.