नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी ते खेडदिगर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये किंमतीचे कापडाचे गठाण लंपास केले.
ब्राह्मणपूरी ते खेडदिगर रस्त्यावर मोहंमद अजहर मोहंमद नजर यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक (क्र.एम.एच.१८ एए ६९८८) रस्त्यावर उभा केला होता. ट्रकमधून चोरट्यांनी पाच लाख ५० हजार रुपये किंमतीचे १५ बॉक्स गठाण चोरुन नेले.
याबाबत मोहंमद अजहर मोहंमद नजर यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बिऱ्हाडे करीत आहेत.