नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे येथील शेत शिवारातून जलपरी चोरुन नेल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील शामलाल हरीचंद्र मिश्रा यांचे गट क्र.७/२ मध्ये शेत आहे. शेतात अरुण संजय पानपाटील, दीपक सुदाम भील व संजय गजमल भील सर्व रा.बलवंड, ता.नंदुरबार यांनी प्रवेश करुन २० हजार रुपये किंमतीची ७ हॉर्स पॉवरची एक जलपरी चोरुन नेली.
याबाबत शामलाल मिश्रा यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.