Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पुरवणीचे प्रकाशन होणार

Mahesh Patil by Mahesh Patil
August 19, 2022
in राज्य
0
जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पुरवणीचे प्रकाशन होणार

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्याचे विशेष जिल्हा पुरवणी गॅझेटिअर तयार करावयाचे आहे. शासनाच्या माध्यमातून तयार होणारा हा महत्वपूर्ण दस्तऐवज असणार आहे. या गॅझेटिअरमध्ये जिल्ह्यात गेल्या 25 वर्षांत झालेल्या विकासात्मक कामांचे प्रतिबिंब उमटावे. यासह संस्कृती, परंपरांच्या सर्वंकष माहितीचा समावेश असावा. त्यासाठी आवश्यक महत्वपूर्ण माहिती संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांनी आज येथे दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा पुनवर्सन अधिकारी नितीन सदगीर (ससप्र), जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वास वळवी, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी (प्राथमिक) यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

कार्यकारी संपादक डॉ. बलसेकर यांनी सांगितले, की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुरवणी गॅझेटिअर तयार करण्यात येत आहे. गॅझेटिअरला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या गॅझेटिअरची दखल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली आहे. विशेष पुरवणी गॅझेटिअरमध्ये जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती, परंपरा, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, पायाभूत सोयीसुविधा, परंपरा, वेशभूषा, ऐतिहासिक वास्तू, विविध प्रकल्प, औद्योगिक प्रकल्पासह विविध सांख्यिकीय आणि विश्लेषणात्मक माहिती उच्च दर्जाच्या छायाचित्रांसह अपेक्षित आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळसारखे पर्यटन केंद्र आहे. या गॅझेटिअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देशातच नव्हे, तर जगभर जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढून या जिल्ह्यात रोजगाराच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागप्रमुखाने आपापल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती परिपूर्ण आणि अद्ययावत द्यावी. अमृत महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून या 75 वर्षांच्या विकासाचा आढावा घेवून एक विश्वसनीय आणि वस्तूनिष्ठ दस्तऐवज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी तातडीने माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

 

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी स्वतंत्र समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य सर्व विभाग आपापली माहिती परिपूर्ण आणि छायाचित्रांसह उपलब्ध करून देतील.

 

तसे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही माहिती अद्ययावत करण्याची संधी अन्य विभागांना उपलब्ध झाली आहे. उर्वरित माहिती सर्व विभाग लवकरच उपलब्ध करून देतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही मौलिक सूचना केल्या. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे वनविभागाच्या कारवाईत साडेतीन लाखांचे जळाऊ लाकूड जप्त

Next Post

रजाळे येथे जलपरी चोरीप्रकरणी तिघांना अटक

Next Post
रजाळे येथे जलपरी चोरीप्रकरणी तिघांना अटक

रजाळे येथे जलपरी चोरीप्रकरणी तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025
बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

October 20, 2025
अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

October 20, 2025
‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group