शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या जी.एम. चौधरी तंत्रनिकेतनात नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीद्वारे 82 विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारा निवड झाली आहे.
जी.एम.चौधरी तंत्रनिकेतनात नुकत्याच कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. यात मेकॅनिकल शाखेच्या 24 व इलेक्ट्रिकल शाखेच्या 58 अशा एकूण 82 विद्यार्थ्यांची यशस्वी ग्रुपच्या वतीने जीकेएन फाॅकर, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, जॉन डियर इलेक्ट्रिक सोल्युशन, दाना इंडिया अशा विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य बी.के.सोनी आदींनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कॅम्पस मुलाखतीसाठी तंत्रनिकेतनचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.जे.टी.पाटील, विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.