नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चिखली येथून कोळपणी यंत्र लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यातील चिखली येथून चोरट्यांनी ६० हजार रुपये किंमतीचे कोळपणी यंत्र चोरुन नेल्याची घटना घडली. अरविंद कोमाजी कोकणी यांचे मालकीचे ६० हजार रुपये किंमतीचे लाल रंगाचे मॉडल एसपीडब्ल्यू ११५०० डी (एमएस) ९ हॉर्स पॉवरचे कोळपणी यंत्र चोरट्यांनी चोरुन नेले.
याबाबत अरविंद कोकणी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.








