नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील नवयुवक मित्र मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यात अध्यक्षपदी जितेंद्र ईश्वर कोकणी तर उपाध्यक्ष म्हणून निलेश दिलीप चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आले आहे.

नंदूरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील नवयुवक मित्र मंडळ हे सर्वात मोठे मंडळ असून त्यांच्यातर्फे वर्षभरात विविध विधायक उपक्रम राबविण्यात येतात. आगामी गणेशोत्सव साठी नवयुवक मित्र मंडळ ठाणेपाडा यांची सर्वसाधारण बैठक झाली. यात अध्यक्षपदी जितेंद्र ईश्वर कोकणी तर उपाध्यक्ष म्हणून निलेश दिलीप चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आले आहे.
आगामी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात मनवण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे जितेंद्र कोकणी यांनी सांगितले.








