नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार 75 व शहादा तालुक्यातील 74
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
या ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका,
नंदुरबार तालुका :
काळंबा , रनाळेखुर्द , भोणे , वाघशेपा , धीरजगाव , चाकळे , धुळवद , नळवे खुर्द , निमगाव , पावला , वेळवाद , बिलाडी , नंदपूर , लहान शहादे , आष्टे , अजेपूर , अंबापूर , बालआमराई , ढेकवद , दुधाळे , फुलसरे , घोगळगाव , हरिपूर , जळखे , खामगाव , नागसर , नांदखें , नारायणपूर , नवागाव , निंबोणी , पाचोराबारी , पिंप्री , शिरवाडे , श्रीरामपूर , सुतारे , उमज , वडझाकण , वाघाळे , विरचक , टोकरतलाव , गंगापूर , इंद्रीहट्टी , पळाशी , ठाणेपाडा , वाघोदा , वरूळ , वासदरे , दहिंदुले बुद्रुक , दहिंदुले खुर्द , होळतर्फे हवेली , खोडसगाव , कोळदे , पातोंडा , शिंदे , आर्डीतारा , भांगडा , भवाणीपाडा , देवपूर , धमडाई , गुजरभवाली , करजकुपे , कोठली , लोय , मालपूर , मंगळूर , नळवे बुद्रुक , नटावद , पथराई , राजापूर , शेजवे , शिवपूर , सुंदर्दे , उमर्दे बुद्रुक , वसलाई , व्याहूर या गावांचा समावेश आहे .
शहादा तालुका :
अलखेड , आकसपूर , ओझर्टा , काकर्देदिगर , काथर्देदिगर , काथर्दे खुर्द , कानडीतर्फे हवेली , तहऱ्हाडीतर्फे बोरद , परिवर्धा , बुढीगव्हाण , मंदाणे , लगंडीभवानी , वडछील , शोभानगर , अंबापूर , करणखेडा , चिरखान , टुकी , तिखोरा , प्रकाशा , फत्तेपूर , भागापूर , मुबारकपूर , मोहिदेतर्फे हवेली , मानमोड्या , लोहारे , वडगाव , चिरडे , भादे , कौठळतर्फे शहादा , सुलवाड़े , औरंगपूर , कलसाडी , कंसाई , खरगोन , खापरखेडा , जावदेतर्फे बोरद , टवळाई , डोंगरगाव , दुधखेडा , नांदे , पिप्राणी , भोंगरा , रायखेड , लोणखेडा , वैजाली , शहाणे , होळउंटावद , पुरुषोत्तमनगर , कोंढावळ , आमोदा , इस्लामपूर , काथर्देदिगर , कुरंगी , कोचरा , खेडदिगर , चिखली बुद्रुक , चांदसैली , जावदेतर्फे हवेली , जवखेडा , टेंभली , तलावडी , पिंगाणे , पिंपर्डे , भुलाणे , मलगाव , वडाळी , सावखेडा , कहाटूळल मडकाणी , नांदर्डे , रामपूर , पळासवाडा , काकर्देखुर्द , धुरखेडा या गावांचा समावेश आहे .








