Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पदवीधर महामंडळ स्थापनेसाठी प्रयत्नशील : सुनील पाटील

team by team
August 20, 2021
in राजकीय
0
पदवीधर महामंडळ स्थापनेसाठी प्रयत्नशील : सुनील पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी

पदवीधारकांच्या कल्याणासाठी आमदार अरुण लाड यांच्या नेृत्वाखालील पदवीधर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यास मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. पुढील काळात पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांनी केले. पदवीधरांमध्ये जनजागृती व्हावी यानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी श्री.पाटील पुढे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. पदवीधरांसाठी गेल्या तीन वर्षापासून काम करत आहे. तरुणांच्या कल्याणासाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा मुद्दा राष्ट्रवादी पदवीधर संघाने हाती घेतला आहे. हे महामंडळ स्थापन करण्यास सरकार तयार असून मंत्र्यांनी त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच प्रदेश उपाध्यक्ष शेषराव भोसले म्हणाले राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या माध्यमातून पदवीधारकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ या प्रमाणे पदवीधारकांसाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. यानंतर नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, देशाचे भवितव्य हा युवक घडवतो. त्यामुळे युवकांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष मेंगडे, नंदुरबार  जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्रसिंग राजपूत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जितेंद्र कोकणी, िसताराम पावरा, बबलू कदमबांडे, माधव पाटील, सुरेंद्र कुवर, महेद्र कुवर, पंकज पाटील, राज ठाकरे, लल्ला (पैलवान) मराठे, सुरेश वळवी, निलेश ठाकरे, निलेश चौधरी, रुपेश जगताप, सागर कोळी, मिलिन जाधव, हेमंत बिरारे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

ग्राहक हिताच्या कार्याला प्राधान्य द्या-विकास महाजन

Next Post

ट्रकच्या धडकेत धडगाव येथील पिता-पुत्री ठार, दोघे गंभीर

Next Post

ट्रकच्या धडकेत धडगाव येथील पिता-पुत्री ठार, दोघे गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add