नवापूर l प्रतिनिधी
नवापूर नवापूर नगरपालिकेने २०१८ या वर्षात आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत शहरातील लहान चिंचपाडा, लखानी पार्क,लालबारी,येथे ६५ हजार लिटर सपतेचे पाणी पुरवठा नविन जलकुंभ निर्मीती करण्यासाठी मंजुरी दिली होती.काम देखील प्रगती पथावर होते पंरतु ठेकेदाराने सदर जलकुंभाचे काम निकृष्ट दर्जाचे केले होते.

निवेदा प्रमाणे लोखंडी पाऊप टाकने गरजेचे होते पंरतु ठेकेदाराने पी वी सी पाईप टाकले तेही जमिनीत केवळ एक फुट खाली टाकुन नियम बाय काम केले त्याकाळात नरपालिकेत मुख्यधिकारी म्हणून आय. एस.अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी पदभार स्विकारला होता.व त्यांनी सदर कामाची चौकशी केली असता त्यात प्रचंड नियम बाह्य काम ठेकेदारानी केल्याचे लक्षात आले.तेव्हा त्यांनी सदर कामाचा अहवाल जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे सादर करुन ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्याला काळ्या यादीत टाकावे असे नमुद केले होते.
सदर ठेकेदाराला नविन जलकुंभ निरमीतीच्या अनुभव नसतांना नेमावली विरुध्द काम दिले गेले होते.सदर काम अद्याप ही अपुर्ण असल्याने व वरील परीसर आदिवासी वस्तीत असल्याने सदर भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती.म्हणून नवापूर तालुका भारतीय जनता पाटी तर्फे मे २०२१ वर्षा पासुन सदर कामाची चौकशी होऊन सदर ठेकेदार बांधकाम अभियंता व याकामातील खाते नियाय चौकशी होऊन कार्यवाही होऊन ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी जिल्हाधिकारी व सर्व संमधीत अधिका-यांना दिले होते.
पंरतु चारदा निवेदन देऊन ही जिल्हाधिकारी सह नवापूर नगरपालिका प्रशासनाने निवेदनाची कुठलीही चौकशी न करता ठेकेदाराला अर्धवट रक्कमाचे धनादेश देऊन टाकले आहे.म्हणून भाजपाने यांच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली भर पाऊसात तहसिल कार्यालया समोर उपोषण केले. उपोषणाची दखल खा. डॉ. हिना गावीत यांनी घेतल्या नंतर नगरपालिका प्रशासन जागे झाले.व नगराध्यक्षा सौ. हेमलता पाटील,उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया,नगरसेवक गिरीष गावीत व मुख्यधिकारी सप्नील मुधलवाडकर यांनी उपोषन करत्यांची भेट घेऊन सदर प्रकरणी नवापूर नगरपालिकेच्या बांधकाम अभियंता , लेखापाल व लेखापरीक्षक यांची समिती स्थापन करुन त्यांच्या अहवाल सात दिवसात प्राप्त करुन त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्व साधारण सभा ठेवण्यात येईल व सभेने उचित निर्णय घेतल्या नंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्या नंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.
या नंतर भाजपाचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदधिका-यांचे शिष्टमंडळ नंदुरबार येथे जाऊन ना. डॉ विजयकुमार गावीत व खा. डॉ हिना गावीत यांची भेट घेऊन नवापूर नगरपालिकेच्या भष्ट्राचार प्रकरनी भाजपातर्फे आता पर्यंत अनेक निवेदन देण्यात येऊन सुध्दा जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाने कुठली ही दखल न घेता भष्ट्राचारी मक्तेदाराला पाठिशी घातले जात आहे. अशी तक्रार केली.
नामदार डॉ. गावीत व खा.डॉ. गावीत यांनी भाजपाने नवापूर नगरपालिकेत्या भष्ट्राचार बाबद दिलेल्या सर्व निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंञी व उपमुख्यमंञी यांना नविन निवेदना सह तक्रार करावी व त्यांती प्रत आमच्या कडे द्यावी त्या नंतर आम्ही या सर्व प्रकरणाची चौकशी करुन योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.त्यामुळे आता नवापूर नगरपालिकेच्या सर्व भष्ट्राचाराचे चौकशी होऊन संबंधितांवर कार्यवाही होईल अशी आशा नवापूरकर जनतेस झाली आहे.








