नंदुरबार l प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे यंदाही येथील जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन शेखर मराठे यांनी केले आहे.
दरवर्षी नंदुरबारला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतू कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सर्व उत्सवांवर निर्बंध आल्यामुळे दहीहंडी उत्सव साजरा होवू शकला नाही. परंतू यावर्षी महाराष्ट्र शासनाने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केले आहेत. त्यामुळे यावर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे.
सालाबादाप्रमाणे या वर्षीही दहीहंडी उत्सव दि.२० ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी सकाळी ८ वाजता येथील सुभाष चौकात साजरा होत आहे. यावेळी ज्या व्यायाम शाळेचे गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी जय बजरंग व्यायाम शाळेचे शेखर मराठे (मो.नं.७०३८७२००४३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे करण्यात आले आहे.








