नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चितवी गावात अतिवृष्टीमुळे एका घराची पडझड झाली यात अंगावर घराची भिंत कोसळल्याने घरातील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.तहसील कार्यालय मार्फत याबाबत माहिती प्राप्त झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चितवी गावात दि. 16 ऑगस्ट 2022 रोजी एका घराची पडझड झाली या घरातील रहिवासी कागडीबाई धाऱ्या गावित या महिलेवर घराची भिंत कोसळल्याने त्यात दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पंचनामा करून चितवी गावातील तलाठी यांच्यामार्फत तहसीलदार नवापूर यांना माहिती देण्यात आली तहसीलदारांमार्फत सदरची माहिती एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.








