नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील जांभीपाडा येथील नाल्याचा फर्शी पुलावर मासे पकडण्यासाठी गेलेले गुरुदिप दिलीप पाडवी (वय २८ )आणि गणेश मोतु पाडवी (वय ४०) रा जांभीपाडा हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेल्याची घटना घडली.एकाच गावातील दोन व्यक्ती पाण्यात वाहुन गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.चौविस तासानंतर एका तरुणाला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
नाल्याचा काही अंतरावर दोन नद्यांचा संगमच्या ठिकाणी पाण्यातील चंदनपाण्यात गुरुदिप दिलीप पाडवी (वय २८ ) हा मृत अवस्थेत आढळुन आला असुन शवविच्छेदन साठी धानोरा ग्रामिण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजेचा सुमारास ते गुरुदिप दिलीप पाडवी (वय २८ वर्षे), व गणेश मोतु पाडवी( वय ४० वर्षे ) दोन्ही रा. जांभीपाडा ता. जि. नंदुरबार असे जांभीपाडा गावा जवळ असलेले नाल्याचे फर्शी पुलावर मासे पकडण्यासाठी गेले होते, सदर नाल्याच्या पाण्यात मासे पकडत असतांना नाल्यात पाण्याच्या अचानक प्रवाह वाढल्याने ते दोघे पाण्याच्या प्रवाह सोबत वाहू लागले तेव्हा सोबत असलेला आकाश पाडवी हा वाचविण्यासाठी पाण्यात उतरला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो सुध्दा त्यांचे सोबत वाहू लागला
परंतु त्याला इतर लोकांनी काठीच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले मात्र गुरुदिप पाडवी व गणेश पाडवी हे सदर पाण्यात वाहून गेले व इतर लोकांनी पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत घटनास्थळी शोध कार्य युध्दपातळीवर सुरु आहे प्रकाशा येथुन गोताखोर यांचे पाचारण करण्यात आले होते अखेर चौविस तासा नंतर नाल्याचा काही अंतरावर दोन नद्यांचा संगमच्या ठिकाणी पाण्यातील चंदनपाण्यात गुरुदिप दिलीप पाडवी (वय २८) हा मृत अवस्थेत आढळुन आला.
यावेळी उपनगर पोलिस ठाणेचे सहा.पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे व तहसिलदार भाऊसाहेब थोरात, सहा.पोलिस उपनिरीकक्ष केशव गावित, पो.हे.कॉ. नारायण भिल,पो.कॉ अनिल वसावे आदि घटनास्थळी उपस्थीत होते.








