Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

team by team
August 16, 2022
in शैक्षणिक
0
हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

नंदूरबार l प्रतिनिधी

हिरा प्रतिष्ठान संचलित श्री.सहकारमहर्षी श्री.अण्णासाहेब पि.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, सौ. ताईसाहेब इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्त संस्थेचे अध्यक्ष व श्री. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या शुभहस्ते शालेय प्रांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न करण्यात आले.

 


यासमारंभ प्रसंगी संस्थेचे संचालक बळवंत जाधव, डॉ.सुधीर भोलाणे,संस्थेच्या संचालिका सौ.अनिता चौधरी,हिरा फाउंडेशनच्या संचालिका सौ.प्रणिता चौधरी, युवा नेतृत्व प्रथमेश चौधरी,नगरसेवक प्रशांत चौधरी, निलेश पाडवी, कमल ठाकूर,भाजपा पदाधिकारी प्रकाश चौधरी, महेंद्र बोरसे, राजेंद्र शर्मा, सामाजिक कार्यकर्ते अजिज खाटीक, राजेंद्र गोरख चौधरी,राजेंद्र एकनाथ चौधरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील, किरण त्रिवेदी, प्रा. चंद्रकांत वाणी तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्याया अमृतमहोत्सवा निमित्त हिरा प्रतिष्ठान अधिनिस्त सर्व विद्यालयांच्या वतीने देशभक्तीपर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात थोर महापुरुषांची वेशभूषा, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, बासरीवादन,सर्वधर्म समभाव वेशभूषा,आदिवासी नृत्य,नाटिका अशा विविध कलागुणांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा व एकतेचा संदेश देत अमृतमहोत्सवाचा आनंद साजरा केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत संस्थेचे संचालक शबळवंत जाधव यांचा वाढदिवसानिमित्ताने मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी सुरेंद्र पाटील यांची नवनियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. राज्य गाईड पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कु.वैष्णवी अभय सोनार, कु.भूमिका कैलास पानपाटील, कु.पौर्णिमा विजय पवार, कु.युक्ती अर्जुन वायकर या विद्यार्थिनींचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्काऊट गाईड शिक्षिका श्रीमती. छाया मोरे यांचा व पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी वादन शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल इयत्ता 11 वी चा विद्यार्थी रोहन संतोष चौधरी याचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच इयत्ता 8 वी एनएमएमएस परीक्षेत 15 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल व 8 वी पास 30 विद्यार्थिनींना शासनाकडून मोफत सायकल प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जि.नाशिक,बाल संस्कार व युवा प्रबोधन विभाग आयोजित संकल्प एक कोटी वृक्ष लागवड या महा वृक्षारोपण अभियान लागवड व संवर्धन उपक्रमा अंतर्गत श्री स्वामी समर्थ केंद्र, नंदुरबार व हिरा प्रतिष्ठान यांच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी उपस्थित होते.

 

सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका सौ.अनिता चौधरी व हिरा फाउंडेशनच्या संचालिका सौ.प्रणिता चौधरी यांच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आले. तसेच नांदर्खे येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा जवाहरलाल राठोड यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश चव्हाण, ध्वजारोहणाचे सुत्रसंचालन श्रीमती.चेतना चौधरी,सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अनिल चौधरी,सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीष काटके व आभार प्रदर्शन श्रीमती.सोनल मोरे यांनी केले तर समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे प्राचार्य,मुख्याध्यापक,प्राध्यापक – प्राध्यापिका, शिक्षक – शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

के. आर. पब्लिक स्कुलमध्ये स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा

Next Post

सकाळी 11 वाजेला जिथे असाल तिथे दोन मिनिटे स्तब्ध उभे रहा, जिल्ह्यात आज एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

Next Post
आधार क्रमांक मतदान कार्डशी लिंक करावे: जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

सकाळी 11 वाजेला जिथे असाल तिथे दोन मिनिटे स्तब्ध उभे रहा, जिल्ह्यात आज एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add