नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्टेशन येथून 14 ऑगस्ट 2022 रोजी दुपारच्या वेळेस एक धक्कादायक घटना समोर आली आहे सुरत नंदुरबार मेमो रेल्वे एका 10 ते 15 दिवसांच्या नवजात बाळ त्याचे पालक सोडून गेल्याची घटना घडली आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात त्या बाळाच्या पालकांविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट 2022 रोजी सुरत नंदुरबार मेमो ट्रेन क्रमांक 09377 मध्ये एका 10 ते 15 दिवसांच्या पुरुष जातीच्या बाळाला त्याच्या पालकांनी पालन पोषण व सांभाळ न करण्याच्या उद्देशाने चिंचपाडा रेल्वे स्टेशन येथे बेवारस स्थितीत सोडून निघून गेले बालकाचा रंग सावळा असून अंगावर पिवळ्या रंगाचे झबले आहे. हे बाळ सुरत नंदुरबार मेमो मधील एका रेल्वे डब्याच्या सीटवर बेवारस स्थितीत रडत होते.या बाळाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. परंतु बाळाची मदत करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते अखेर चिंचपाडा गावातील एका फेरीवाल्या महिलेने पुढाकार घेत सदर बालकाला रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क साधून नंदुरबार रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर बाळावर नंदुरबार जिल्हा रुग्णालय यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या बाळाची ओळख पटल्यास नंदुरबार रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.








