नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा कॉंग्रेस भवनात भारताचे माजी पंतप्रधान तथा संगणक युगाचे प्रणेते स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी राजीव गांधींच्या स्मृतीस अभिवादन प्रसंगी सांगितले की, वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान बनलेले राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. देशात पिढी बदलाचे अग्रदूत राजीव गांधी यांना इतिहासातील सर्वाधिक जनादेश मिळाला होता. आधुनिक विचार व अदभूत निर्णयक्षमता असलेले श्री. राजीव गांधी भारताला जगातील उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण करू इच्छित होते. ते सतत म्हणत की भारत एकसंघ ठेवण्याव्यतिरिक्त २१ व्या शतकातील भारत निर्माण करणे, हेही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यावेळी कॉंग्रेस किसान सेलचे महाराष्ट्र सचिव देवाजी चौधरी, कॉंग्रेस अल्पसंख्यांक शहराध्यक्ष हाजी असलम चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र कोठारी, माजी नगरसेवक इकबाल खाटीक, महिला जिल्हाध्यक्षा टी.आर. खान, रऊफ गुलाब शाह, ऍड.राहुल कुवर, भास्कर सोनवणे, युनुस कुरेशी, शमा शेख आदी उपस्थित होते.