नंदूरबार l प्रतिनिधी
मासेमारीसाठी नाल्यात गेले असता अचानक पूर आल्याने दोन जण वाहून गेल्याची घटना नंदूरबार तालुक्यातील जांभीपाडा येथे घडली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
गुरुदिप दिलीप पाडवी( वय 28) वर गणेश मोतु पाडवी (वय 40) दोन्ही रा . जांभीपाडा ता . जि . नंदुरबार दि . 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा.चे सुमारास ते व त्यांचे सोबत त्यांचा भाऊ गुरुदिप दिलीप पाडवी, गणेश मोतु पाडवी दोन्ही रा . जांभीपाडा ता. नंदुरबार असे जांभीपाडा गावा जवळ असलेले नाल्याचे फर्शी पुलावर मासे पकडण्यासाठी गेले होते ,
सदर नाल्याच्या पाण्यात मासे पकडत असतांना नाल्यात पाण्याच्या अचानक प्रवाह वाढल्याने ते दोघे पाण्याच्या प्रवाह सोबत वाहु लागले तेव्हा खबर देणारं हे त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरले त्यावेळी खबर देणारा सुध्दा त्यांचे सोबत वाहू लागला परंतु त्याला इतर लोकांनी काठीच्या साह्याने बाहेर काढून वाचविले. मात्र गुरुदिप पाडवी व गणेश पाडवी हे सदर पाण्यात वाहून गेले त्यांचा खबर देणार व इतर लोकांनी पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत .
याबाबत आकाश दिलीप पाडवी यांच्या खाबरी वरून उपनगर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली आहे.मिसिंग व्यक्तींमिळून आल्यास उपनगर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास
असई केशव मिठ्या गावीत करीत आहेत.








