नंदूरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता. जि. नंदुरबार येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन ७५ वा “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष विजय भास्करराव पाटील यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच मागासवर्गीय कन्या छात्रालयाचे ध्वजारोहण देविदास हिरामण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील, सचिव भिका भाना पाटील, सरपंच सौ. जागृती पाटील, ग्रामपंचायत सदस्य तथा प्राध्यापिका सौ.कविता चंद्रशेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य तथा उपशिक्षिका शोभा प्रल्हाद बागुल, संचालक मंडळातील सर्व सदस्य भालेर, नगाव, तिशी, काकरदे पंचक्रोशीतील सर्व पालक संस्थेचे हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीताद्वारे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही व्ही इसी यांनी केले . प्रास्ताविक प्राचार्य सौ.विद्या चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे फलक लेखन रेखाटन कलाशिक्षक व्ही. आर. ठाकरे यांनी केले. स्वागत गीताची तयारी सर्व महिला शिक्षिका यांनी करुन घेतली.साउंड सिस्टीम ची जबाबदारी निखिल पाटील यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली. शाळा सुशोभीकरण व पटांगण आखणी सर्व बीपीएड शिक्षक, शिक्षिका सर्व कर्मचारी वृंद यांनी एकत्र मिळून केले. आजादी का अमृत महोत्सव सप्ताहात कार्यमातंर्गत आयोजित चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भारत माता, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, आदिवासी पेहराव अशा विविध वेशभूषा साकारून विद्यार्थी आले होते.
यावेळी देशभक्तीपर गीते घेण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर यांनी मानले. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना चाॅकलेटचे वाटप करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन मुख्याध्यापिका सौ.विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.








