नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे सरपणी नदी पुल पुराच्या पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र . 6 वरील वाहतुक वळविण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्र . 6 वरील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे पुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी लहान पुलावरुन वाहतुक सुरु होती . मात्र दि
15 ऑगस्ट 2022 रोजी सरपणी नदीला आलेल्या पुरामुळे पर्यायी लहान पुलावर पाणी आल्याने विसरवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र . 6 वरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे . वाहतुक मार्ग
गुजरात ( सुरतहुन ) येणारे विसरवाडी नंदुरबार – दौडाईचा – धुळे ( ये – जा ) व धुळयाहुन येणारे शेवाळी – निजामपुर छडवेल – नंदुरबार – विसरवाडी यामार्गाने गुजरात ( ये – जा ) व दुसरा मार्ग नंदुरबार – उच्छल मार्ग गुजरात ( ये – जा ) या मार्गाने देखील जाता येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , सुधीर खांदे यांनी कळविले आहे.








