नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या कार अपघातात शिवसंग्राम पक्ष व मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे काल दि.१४ रोजी दुखद निधन झाल्याने जिल्ह्यातील मराठा समाजातर्फे नंदुरबार येथील जुनी नगरपालिकेजवळ त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करतांना सकल मराठा समाज, मराठा आरक्षण समिती, मराठा क्रांती मोर्चा व समाज बांधव तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली आहे.
सतत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा आणि गोरगरिबांच्या समस्यायांसाठी झटणारा नेता हरपल्याने मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दरम्यान श्रद्धांजली कार्यक्रमावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.








