नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार अँड. के.सी.पाडवी यांचे वडील चांद्या जुगला पाडवी यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. 93 वर्षीय असलेले चांद्या पाडवी हे सातपुड्याचे कारभारी चांद्य जुगला पाडवी म्हणुन ओळखल्या जायचे. गेल्या काही दिवसांपासुन वयोमान आणि प्रदिर्घ आजाराने त्यांच्यावर नाशिक येथे वैद्यकीय उपचार सुरु होता. आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
त्यांच्यावर १६ ऑगस्ट ला दुपारी साडेतीन वाजता असली येथे अंतीम संस्कार होणार आहे. त्यांना 03 मुले पाच मुली असा मोठा परिवार होता. ॲड. के.सी.पाडवी, डॉ.सिताराम चादया पाडवी,सुभाष चांदया पाडवी, तसेच जि.प.सदस्या ॲड.गिता चादया पाडवी यांच्यासह 4 बहीणी, सुन सौ.हेमलता के पाडवी, नातु ॲड. गोवाल के. पाडवी, नात डॉ.आदिमा के.पाडवी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने पाडवी परिवारावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.








