Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ. विजयकुमार गावीत व खा. डॉ. हिना गावीत यांनी फडकविला घरावर ध्वज

team by team
August 13, 2022
in राजकीय
0
मंत्री डॉ. विजयकुमार गावीत व खा. डॉ. हिना गावीत यांनी फडकविला घरावर ध्वज

नंदुरबार l प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबारच्यावतीने आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीस राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावीत तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. रॅलीत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देण्यात येवून ही रॅली नवापूर चौफुलीपासून सुरु करण्यात येवून कोकणी हिल, धुळे चौफुली, श्रॉफ हायस्कुल मार्ग अंधारे स्टॉप येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागाचे डॉ. आनंद जामकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. अमोल किंनगे, डॉ. हरीष वानखेडे, डॉ. दिप्ती निमजे,डॉ.निखिल गोडे डॉ.अमोल वाघमारे, रॅलीचे मुख्य संयोजक डॉ. प्रशात पाटील, लघुलेखक साहेबराव मोरे, कार्यालयीन अधीक्षक दिलीप पावरा,आर.डी.मुळे,साबीर काजी, मनोजसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थी व विद्यार्थीनी या रॅलीत सहभागी झाले होते.

‘‘घरो घरी तिरंगा’’ महोत्सवातंर्गत
मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी फडकविला घरावर ध्वज

नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होवून वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियान आजपासून राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आपल्या राहत्या घरी ध्वज फडकवून या मोहिमेत सहभाग नोंदविला. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवून या देशव्यापी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

खा. डॉ. हिना गावीत यांनी फडकविला घरावर ध्वज

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियान आजपासून राबविण्यात येत असून या अभियानातंर्गत खा. डॉ. हिना गावीत यांनी आपल्या राहत्या घरी ध्वज फडकवून या मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या अभियानांत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुप्रिया गावीत ही उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा
Previous Post

आरपीआय आठवले युवक आघाडीतर्फे ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वागत

Next Post

गिधकडा धबधबा परिसरास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट

Next Post
गिधकडा धबधबा परिसरास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट

गिधकडा धबधबा परिसरास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add