नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून ना.डॉ. विजयकुमार गावित यांची घोषणा होण्याची शक्यता असून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वजारोहण करणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे.
15 ऑगस्ट रोजी ज्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळातला निर्णय घेण्यात आला असून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून
शपथ घेतलेले डॉ.विजयकुमार गावित यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागण्याची संकेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले असून येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ध्वजारोहण हे राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करणार असल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.