शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सुप्रसिद्ध गझलकार अनंत नांदुरकर अमरावती व सौ.हेमलता पाटील शहादा यांच्या हस्ते सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील होते.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.एस.डी. सिंदखेडकर, डॉ. एम.के. पटेल, प्रा.कल्पना पटेल, सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा.डाॅ. सतीश भांडे उपस्थित होते.गझलकार श्री.नांदूरकर व सौ. पाटील यांनी गझल रचना व गझल सादरीकरण याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले, महाविद्यालयीन तरुणाईच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असते. सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी आपले कला कौशल्य सादर करू शकतात. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रा.डाॅ. सतीश भांडे यांची गझल मैफल सादर करण्यात आली.
सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.