शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. एन.नुराणी कनिष्ठ महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग वरिष्ठ महाविद्यालय शहादा, यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज महोत्सव दि.9ऑगस्ट ते 17ऑगस्ट या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. आज जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनीनी आदिवासी नृत्य कला या प्रसंगी सादर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आर. एस. पाटील होते. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. एम. के.पटेल , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.कल्पना पटेल, प्रा. व्ही.सी.डोळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्र संचालन प्रा.रंजना गावित तर आभार प्रगटन प्रा.उर्मिला पावरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा. से.यो.महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.वर्षा चौधरी, प्रा. वजिह अशहर यांनी प्रयत्न केले.