नंदूरबार l प्रतिनिधी
आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाच्या वतीने नंदूरबार येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आज दि. 9ऑगस्ट रोजी मुंबई येथील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याचे आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान नंदुरबार येथील त्यांच्या निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांच्या नेतृत्वात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.