Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लक्कडकोट येथील खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप

team by team
August 7, 2022
in क्राईम
0
लक्कडकोट येथील खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप

नंदूरबार l प्रतिनिधी

दगडाने डोके ठेचुन ठार मारल्याप्रकरणी तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस.दातीर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील बोला गुलाब ठाकरे आणि संतोष लाशा रावताळे, प्रकाश शिवाजी रावताळे व संदीप मदन तडवी (रा.लक्कडकोट) यांच्यात दि.२६ जानेवारी २०१३ रोजी किरकोळ वाद होऊन हाणामारी झाली होती.

त्याचा राग आल्याने संतोष रावताळे, प्रकाश शिवाजी रावताळे, संदीप तडवी यांनी बोला गुलाब ठाकरे यास मोटरसायकलीवर घेऊन जाऊन राणीपूर रोडवर ईश्वर गणपत बिल यांच्या शेताच्या बांधालगत बुला ठाकरे यांच्याशी हाणामारी सुरू केली व दगडाने ठेचून जीवे ठार मारले.

याबाबत म्हसावद पोलिसात तिघांविरुद्ध भा.द.वि कलम ३०२, ३४ अन्वये मयताची पत्नी आशा बुला ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलीस स्टेशनला तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह परदेशी यांनी आरोपींना अटक केली होती. आरोपीतांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

सदर खटल्याचे सुनावणीचे कामकाज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात होऊन यात महत्त्वाच्या सात साक्षीदारांच्या जवाब नोंदवण्यात आले. यात महत्त्वाची साक्ष म्हणून मयताची पत्नी आशा बुला ठाकरे, वडील गुलाब ठाकरे, पंच मदन रावताळे, पंडित ठाकरे, डॉ. राजेंद्र वळवी व तपासधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या महत्त्वाच्या साक्षी झाल्या.

आरोपितांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी संतोष लाशा रावताळे, प्रकाश शिवाजी रावताळे, संदीप मदन तडवी यांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.एस.दातीर यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अँड. सुवर्णसिंग गिरासे यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रॉफ हायस्कूलने काढली तिरंगा यात्रा, सायकल, मोटरसायकलीसह विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फुर्त सहभाग

Next Post

नंदुरबार येथे चोरट्यांच्या प्रताप, घरफोडी करीत शासकीय कागदपत्रे केली लंपास

Next Post
नंदुरबार येथे चोरट्यांच्या प्रताप, घरफोडी करीत  शासकीय कागदपत्रे केली लंपास

नंदुरबार येथे चोरट्यांच्या प्रताप, घरफोडी करीत शासकीय कागदपत्रे केली लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add