नंदूरबार l प्रतिनिधी
‘ एक भारत श्रेष्ठ भारत ‘ उपक्रमांतर्गत शहादा तालुक्यातील बिलाडी त.श. येथील जिल्हा परिषद शाळेत विविध उपस्थितीत ‘ माहेरची साडी ‘ उपक्रम राबवून महिलांचा गौरव व सत्कार करण्यात आला .
मान्यवरांच्या दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद शाळा बिलाडी त.श. शाळेत सचिन पत्की यांनी केंद्रप्रमुख वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने विविध माता भगिनी यांचा माहेरची साडी देऊन सत्कार केला . यावेळी कन्यारत्नाला जन्म देणाऱ्या माता ,
कोरोना योद्धा महिला आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर , अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा प्रमाणपत्र , पुस्तक , साडी देऊन सत्कार करण्यात आला . तसेच वयोवृद्ध मातांचा नऊवारी साडी , मास्क देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमासाठी शिक्षक शांताराम वाडीले , स्मिता बुधे आदींनी परिश्रम घेतले . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पंजन करण्यात आले