नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील लोखाणी पार्क येथे सुमारे २० हजार रुपयांची वीज चोरी केल्यप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील लाखाणी पार्क येथील विजय मोतीलाल सोनवणे याने घरगुती वापरासाठी सर्व्हीस वायरला दोन कोअरच्या काळ्या रंगाच्या वायरच्या सहाय्याने घरातील एका स्वतंत्र स्विचला जोडून १९ हजार ८७६ रुपये किंमतीच्या ११४९ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले.
याबाबत महावितरण कंपनीतील भरारी पथकातील अतिरीक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








