Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस दलाने २०० रिक्षांवर लावले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बॅनर्स

team by team
August 4, 2022
in राज्य
0
पोलीस दलाने २०० रिक्षांवर लावले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बॅनर्स

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील सुमारे २०० रिक्षांवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या आशयाचे बॅनर्स लावण्यात आले. दरम्यान, नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांविषयी समाजातील प्रत्येक घटकांना माहिती व्हावी याकरीता पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने आज दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी नंदुरबार शहरातील ३ आसनी व ६ आसनी रिक्षांना लावण्यात येणारे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या आशयाचे बॅनर्सचे अनावरण जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते झाले.

सन २०२२ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून देशभरात उत्साहाने साजरे करण्यात येणार आहेत. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार असून सदर कार्यक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग तसेच त्यांच्यामध्ये उत्साह व जागृती व्हावी याकरीता पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील सुमारे २०० रिक्षांवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या आशयाचे बॅनर्स लावण्यात आले.

याप्रसंगी डी.आर.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे सुमारे ५०० विद्यार्थी / विद्यार्थिनी उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी अंधारे चौक परिसर दणाणून दिला होता. सुमारे २०० रिक्षांवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या आशयाचे बॅनर्स लावल्यानंतर रॅली सुरु करण्यात आली.

सदर कार्यक्रमास पोलीस उप-अधीक्षक आत्माराम प्रधान, तहसिलदार रावसोबत थोरात, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षकभरत जाधव, डी.आर. हायस्कुलचे उप प्राचार्य एम.एल.अहिरराव यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार तसेच डी.आर. हायस्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोद्यात घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

Next Post

शालेय पोषण आहाराच्या लेखापरीक्षणास स्थगिती देण्याचे शिक्षण सचिवांचे शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळास आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add