नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे चारित्र्याच्या संयशावरून पतीने आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.पती स्वतः विसरवाडी पोलिसात हजर झाला.त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल गुलाब तांबे (२६) रा. नांदगाव खोटेश्वर, जि.अमरावती हा नवापूर तालुक्यातील श्रावणी गावातील बँक ऑफ बडोदा जवळ पत्नी व दोन मुलांसह राहत होता.त्याचा कुकर व कुकर व गॅस रिपेरिंग करण्याचा व्यवसाय आहे.
त्याची पत्नी वंदना अनिल तांबे (२२) ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याने मूळ गावी अमरावती जाणार होती दरम्यान अनिल हा वंदनावर चारित्र्याच्या संयश घेत होता. रविवारी दि. ३१) पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्याच्यात भांडण झाली यात आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या वंदनावर चारित्र्याच्या संयश घेत अनिलने तिचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला.
त्यानंतर अनिल याने विसरवाडी पोलिस ठाणे गाठत आत्मसमर्पण केले. वंदना तांबे इचा मुतदेह शवविच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिच्या उदरात तीन किलो वजनाचे व आठ महिन्यांचे मृत अर्भक आढळले.
अनिल तांबे याने पत्नी सोबतच गर्भातील भ्रूणची हत्या करीत दुहेरी खून केला.याप्रकरणी विसरवाडी पोलिसात अनिल तांबे विरुध्द भांदवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.
दरम्यान आईचा मृत्यू व वडिलांना तुरुंगवास नंतर चार वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी यांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.








