नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांची श्रीरामपूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मालेगाव येथील किरण बिडकर यांची नियुक्ती झाली आहे .
काल दि.१५ ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांनी पदभार सोडला असून
किरण बिडकर लवकरच पदभार स्वीकारला आहेत.
दरम्यान , मोटार वाहन निरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . त्यात नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांची तीन वर्ष व ८ महिन्यांपूर्वी नंदुरबार येथे बदली झाली होती .आता त्यांची श्रीरामपूर येथे बदली झाली आहे .
त्यांच्या जागी मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मोटार वाहन निरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची देखील बदली झाली आहे . त्यात नितीन सूर्यवंशी , राहुल महाजन , हिराजी कुमठेकर यांचा समावेश आहे . त्यांच्या जागी जळगाव येथून महेश देशमुख , सचिन बुरड , मालेगाव येथून किरण लोंढे व धुळे येथून रवींद्र बंदरकर यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे . दरम्यान काल दि.१५ ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांनी पदभार सोडला त्यानंतर ते दुपारी ४ वाजेच्या सुमारास रवाना झाले.
किरण बिडकर लवकरच पदभार स्वीकारनार आहेत.